दि . 24 जुलै 2025 वार - गुरुवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] ( मुलाणी )
सरकारी शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग; सरकारी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
म्हसवड – 23 जुलै 2025
माण तालुक्यातील भालवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून शासकीय डॉक्टरविरुद्ध विनयभंग, शारीरिक मारहाण, आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना दिनांक व वेळ:
23 जुलै 2025 रोजी सकाळी 10.45 वाजता
घटनास्थळ:
जि.प. प्रा. शाळा भालवडी, ता. माण, जि. सातारा
तक्रारदार महिला शिक्षिका – ‘निर्भया’ (वय 44, सध्या रा. दहिवडी)
तक्रारीनुसार, आरोपी प्रमोद नारायण नारायणे (रा. मार्डी, ता. माण) यांनी शाळेच्या आवारात येऊन, तक्रारदार शिक्षिकेला हाताने मारहाण केली, शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या साडीचा पदर व ब्लाऊज ओढून विनयभंग केला. शिवाय, तिच्या हातातील खडू फेकून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
गुन्हा दाखल – BNS कलमांखाली कारवाई
गु.र.नं: 248/2025
कलम: BNS 74, 221, 115(2), 351(2)(3), 352
गुन्हा दाखल तारीख: 23 जुलै 2025 रोजी
अटक स्थिती: तपासाखाली असून अटक अजून झालेली नाही.
अधिक माहिती:
तपास अधिकारी: म. पो. हवा 1341 फडतरे – 7588382902
या घटनेने शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात खळबळ उडवली असून, संबंधित आरोपी डॉक्टरवर कारवाईसाठी अनेक शिक्षक संघटनांनीही संताप व्यक्त केला आहे. पुढील तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.
बातमी स्रोत:
मुलाणी ऑल इंडिया न्यूज | www.allindianews.online
//////////////////////////////////(/////////////////(/
No comments:
Post a Comment
Thanks for your