मुलाणी )
24 जुलै 2025 रोजी वावरहिरे (ता. माण, जि. सातारा) येथे बेकायदेशीर देशी दारू विक्री प्रकरणाचा पर्दाफाश करत दहिवडी पोलिसांनी मोठी कारवाई केली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळु श्रीपती जाधव (वय 57 वर्षे, रा. वावरहिरे) याने आपल्या राहत्या घराच्या आडोशाला देशी दारूच्या बाटल्यांची चोरटी विक्री सुरू ठेवली होती. दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष नारायण विरकर (ब.नं. 2499) यांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत, टँगो पंच कंपनीच्या लेबल असलेल्या 90 मि.ली.च्या एकूण 21 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत ₹735/- इतकी आहे.तसेच, नमुन्यासाठी एक बाटली वेगळी काढण्यात आली आहे. गुन्हा महाराष्ट्र प्रोव्हिशन ॲक्ट कलम 65(ई) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. आरोपीस BNSS कलम 35(3) नुसार नोटीस देण्यात आली आहे.ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून तपासाचे काम स.पो.फौ. एम. हांगे करीत आहेत.---गुन्हा घडल्याचे ठिकाण: वावरहिरे, ता. माण, जि. सातारा घडलेली वेळ:
24/07/2025 रोजी सकाळी 10:30 वा. गुन्हा दाखल: 24/07/2025 रोजी सायंकाळी 7:58 वा.---
अधिक माहितीसाठी संपर्क:स.पो.फौ. एम. हांगे – +91 92847 99552सपोनी दत्तात्रय दराडे – +91 94200 25780