दारूच्या नशेत असभ्य वर्तन व डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल – दहिवडी पोलिसांची कारवाई - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani

मुस्लिम निकाह के लिए आज ही रजिस्ट्रेशन करे इस वेब साइट पर muslimnikah.onlin , अच्छे रिश्ते मिलेंगे इस साइट पर सबसे सस्ता वेबसाइट है ये कम पैसे में अच्छा रिश्ता मिलेगा

ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Wednesday, August 6, 2025

दारूच्या नशेत असभ्य वर्तन व डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल – दहिवडी पोलिसांची कारवाई



 दि . ६ अगस्ट २०२५ वार - बुधवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] 
( मुलाणी)
दारूच्या नशेत असभ्य वर्तन व डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल – दहिवडी पोलिसांची कारवाई

दहिवडी (ता. माण) येथे दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी एका व्यक्तीने दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत डायल 112 वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटना मौजे दहिवडी गावातील गांधीनगर परिसरात दुपारी सायंकाळी 5.07 वाजण्याच्या सुमारास घडली. अजय संजय अवघडे (वय 30, रा. गांधीनगर, दहिवडी) याने डायल 112 पोलीस हेल्पलाईनवर कॉल (क्रमांक #CFS29825722) करून, दोन व्यक्तींनी चाकूने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खोटी माहिती दिली.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, अजय अवघडे हा इसम दारूच्या नशेत आरडाओरडा करीत असभ्य वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. चौकशीनंतर त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी फिर्यादी पोलीस नोकरीवर कार्यरत सुधीर गंगाधर करचे (वय 29, पो.कॉ.ब.नं. 268, दहिवडी पोलीस स्टेशन) यांच्या तक्रारीवरून अजय अवघडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) व भारतीय न्याय संहिता कलम 212 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला BNSS कलम 35(3) नुसार नोटीस देण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी. खाडे करीत असून, गुन्हा PN 1199 एन. लोखंडे यांनी नोंदविला आहे. दहिवडी पोलीस ठाण्याच्या त्वरित कारवाईमुळे गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश आले आहे.

📝 रिपोर्टर: All India News . Online
📍ठिकाण: खुटबाव, ता. माण, जि. सातारा
📅 दिनांक: 06 ऑगस्ट 
जाहिराती साठी संपर्क करें -8796706999

No comments:

Post a Comment

Thanks for your