वसई : - वसई विरार शहर महानगरपालिका
आज दिनांक २१ जून २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा करण्यात आला. मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम विभागा अंतर्गत ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त "योग सत्राचे" आयोजन करण्यात आले होते.
योग सत्रामध्ये योग प्रशिक्षक श्री.सुनील व्यास व त्यांच्या सहकारी प्रशिक्षकांमार्फत विविध प्रकारची योगासने सादर करण्यात आली. उपस्थित मान्यवर, मनपा अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांनीही योगासने करीत त्यास उत्तम प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास मा.आमदार श्रीम.स्नेहाताई दुबे - पंडित, मनपा उप-आयुक्त श्रीम.स्वाती देशपांडे, उप-आयुक्त श्री.प्रशांत जाधव, सहाय्यक आयुक्त श्री.विश्वनाथ तळेकर, श्री.मनोज वनमाळी, श्री.व्हिक्टर डीसोजा, जिल्हा क्रीडा संघटक श्री.योगेश चौधरी, विविध शाळेतील विद्यार्थी, मान्यवर नागरिक, पत्रकार, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप-आयुक्त श्रीम.स्वाती देशपांडे यांनी केले तसेच सूत्र संचालन सहाय्यक आयुक्त श्री.विश्वनाथ तळेकर यांनी केले.
==================================
No comments:
Post a Comment
Thanks for your