मुलाणी
म्हसवड : - सातारा जिल्ह्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पुन्हा एकदा अवैध जुगार अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई केली आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वरकुटे मलवडी (ता. माण) येथे सिद्धार्थ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने पोलीस पथकासह छापा टाकला. या कारवाईत 11 जणांना ताब्यात घेऊन 3 लाख 12 हजार 670 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य आणि मोटरसायकल्स यांचा समावेश आहे.या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अटक आरोपींची नावे :1️⃣ कबीर विठ्ठल बनसोडे2️⃣ अर्जुन सर्जेराव यादव3️⃣ सचिन अंकुश यादव4️⃣ गणेश दिगंबर बनसोडे5️⃣ विजय भानुदास जगताप6️⃣ विकास हरी यादव7️⃣ नानासो रामचंद्र मंडले8️⃣ बाळासाहेब रावसाहेब मिसाळ9️⃣ संभाजी मल्हारी मंडले🔟 सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे1️⃣1️⃣ शिवाजी राम मिसाळसर्व आरोपी वरकुटे मलवडी (ता. मान, जि. सातारा) येथील राहिवासी आहेत.ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली :श्री. तुषार दोशी (पोलीस अधीक्षक, सातारा)वैशाली कडूकर मॅडम (अप्पर पोलीस अधीक्षक)अश्विनी शेंडगे मॅडम (उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी)कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी :अक्षय सोनवणे (स.पो.नि.), अनिल वाघमोडे (पो.उ.नि.), अमर नारनवर, देवानंद खाडे, रूपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, सतीश जाधव, श्रीकांत सुद्रिक व पोलीस मित्र नारनवर.
संपूर्ण बातमी अधिकृत संकेतस्थळावर वाचा : ऑल इंडिया न्यूज .ऑनलाईन
No comments:
Post a Comment
Thanks for your