दि . १५ जुलै २०२५ वार - मंगळवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
दिनांक 14 जुलै 2025 रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात ग्रामसेवकावर महिलेसोबत अश्लील वर्तन करणे व जबरदस्तीने पैसे घेऊन पळून जाण्याच्या प्रकारावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर हकिगत अशी की, माण तालुक्यातील ढाकणी येथील शिवारात फिर्यादी महिला शेतात मका खुरपणीचे काम करीत असताना आरोपी मल्हारी पांडुरंग खाडे (वय 48, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) याने चारचाकी गाडीतून येऊन उसने घेतलेले पैसे परत देण्याच्या बहाण्याने महिलेस जवळ बोलावले. त्या ठिकाणी महिलेस शिविगाळ करत तिच्या साडी व ब्लाऊजमध्ये हात घालून छाती दाबून विनयभंग केला. तसेच ब्लाऊजमध्ये ठेवलेले 2000 रुपये जबरदस्तीने काढून पळ काढला.सदर प्रकारानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून भा. न. संहिता नुसार (BNS-119(1), 74, 75(2), 75(3), 76, 78(2), 79) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपी ग्रामसेवक असून सध्या पंचायत समिती जावळी, तालुका जावळी, जिल्हा सातारा येथे कार्यरत आहे.तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे (मो. नं. 9970717712) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.---
ऑल इंडिया न्यूज.ऑनलाईन ( All india News .online )
आपली लोकहिताची विश्वासार्ह न्यूज सर्व्हिस
जाहिराती साठी संपर्क करे मो . नं .8796706999