मुलाणी )
म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
चार वर्षांपासून फरार असलेल्या जबरी चोरीच्या आरोपीस शिताफीने अटक
म्हसवड (ता. माण) —
म्हसवड पोलिसांनी एका गुन्हेगारास चतुराईने अटक करून पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा दाखला दिला आहे. सन 2019 साली गुन्हा रजिस्टर नं. 30/2019 अन्वये भादविस कलम 394, 323, 504, 506, 34 नुसार मारहाण व जबरी चोरी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील रोहिदास शिवाजी जाधव या आरोपीस पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
या प्रकरणात तक्रारदारास लोखंडी रॉड व अन्य घातक शस्त्रांच्या सहाय्याने मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आरोपी गेल्या चार वर्षांपासून सुनावणीस उपस्थित राहत नव्हता, त्यामुळे न्यायालयाकडून त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट (नॉन बेलेबल) जारी करण्यात आले होते.
फरार आरोपीचा माग काढण्यासाठी म्हसवड पोलिसांनी विशेष शोध पथक तयार केले. तांत्रिक साधने आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पळशी येथून आरोपीस अटक केली. पोलिसांनी त्यास आज न्यायालयात हजर केले आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी :
या धडाकेबाज कारवाईमध्ये सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस कर्मचारी भगवान सजगणे, धीरज कवडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलानी, राहुल थोरात, हर्षदा गडदे यांचा मोलाचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment
Thanks for your