दि . 21 जुलै 2025 [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
(मुलाणी )
म्हसवड परिसरात भीषण अपघात - मोटारसायकलस्वार जागीच मुत्यू
पिंपरी गावाजवळ महिंद्रा XUV ची जोरदार धडक; मेव्हणे अपघातात जागीच मुत्यू झाला
म्हसवड : दिनांक 20 जुलै 2025 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास म्हसवड ते सातारा रोडवरील पिंपरी गावाच्या हद्दीत भीषण अपघात घडला. भरधाव वेगात व रॉंग साईडने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा XUV300 (क्र. MH14 LE 1144) या गाडीने स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH11 CS 7567) ला जोरदार धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलस्वार महादेव मानसिंग भालेराव (वय 28, रा. म्हसवड) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्यासह छाती, हात, तोंड गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
या प्रकरणी विशाल बाळु लोखंडे (रा. दिवड, ता. माण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली असून गाडीचालक विजयानंद हणुमंत गुरव (वय 47, रा. आळंदी देवाची, जि. पुणे, मूळ रा. निगडी-पवारांची देगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 245/2025, कलम BNS 106(1), 281, 125(A), 125(B), 324(4) व मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची कारण
गाडीचालक विजयानंद गुरव याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात, चुकीच्या दिशेने वाहन चालवून अपघात घडवला, असे फिर्यादीत नमूद आहे.
तपास अधिकारी :
पोउनि वाघमोडे, म्हसवड पोलीस ठाणे
संपर्क: 9970970838
संपर्क अधिकारी :
API सोनवणे, म्हसवड पोलीस ठाणे
संपर्क: 9970717712
No comments:
Post a Comment
Thanks for your