दिनांक 21/07/2025 वार - सोमवार
[ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
( मुलाणी )
मणकर्णवाडी :- म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मणकर्णवाडी (ता. माण, जि. सातारा) येथील लोणारवस्ती येथे घराशेजारील लोखंडी जाळीच्या वाघरातून तीन शेळ्या चोरीस गेल्याचा प्रकार घडला आहे.
फिर्यादी सौ. कविता राहुल गेंड (वय ३५, लोणारी, व्यवसाय घरकाम व शेती, रा. मणकर्णवाडी, ता. माण, जि. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे, १९ जुलै २०२५ रोजी रात्री ११.५० ते २० जुलै सकाळी ६.३० दरम्यान त्यांच्या घराशेजारी असलेल्या लोखंडी जाळीच्या वाघराला अज्ञात व्यक्तीने कापून प्रवेश केला.
चोरीस गेलेला माल:
1️⃣ अंदाजे १ वर्ष वयाची काळ्या रंगाची गाभण शेळी – किंमत ५,०००/-
2️⃣ अंदाजे ४ वर्ष वयाची पांढऱ्या रंगाची शेळी – किंमत ५,०००/-
3️⃣ अंदाजे ६ वर्ष वयाची काळी-पांढरी रंगाची शेळी – किंमत ५,०००/-
एकूण अंदाजित किंमत: १५,०००/- रुपये.
गुन्हा नोंदविण्याची तारीख: २०/०७/२०२५रोजी दुपारी १२:४१ वा.
गुन्हा दाखल क्रमांक: २४३/ २०२५
कलम: BNS ३०३ ( २ )
गुन्ह्याचा प्रकार: चोरी
अटक / आरोपी: अद्याप अज्ञात
अधिकारी तपास: पो.ह.वा. खाडे (मो. ८९९९२८५४५५)
भेट देणारे अधिकारी: API सोनवणे (मो. ९९७०७१७७१२)
थोडक्यात हकीकत:
फिर्यादीच्या सांगण्यानुसार, अज्ञात चोरट्यांनी घराशेजारील वाघराची जाळी कापून मुद्दाम लबाडीने त्यांच्या मालकीच्या वरील तीन शेळ्या चोरी करून नेल्या आहेत. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
संपर्क: म्हसवड पोलिस स्टेशन
तपास अधिकारी: पो.ह.वा. खाडे
मोबाइल: ८९९९२८५४५५