(मुलाणी )
खुटबाव : - माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे भाऊ यांना त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन खुटबाव येथील कब्रस्तान कंपाऊंड बांधकामासाठी चर्चा करण्यात आली.या भेटीत खुटबाव ते निटवेवाडी घाट मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. या संदर्भात मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच काम मार्गी लागेल अशी हमी दिली.या भेटी दरम्यान अकबर मुलाणी, शकील शेख, आतुल मस्के तसेच ऑल इंडिया न्यूज चे संपादक / ऑल इंडिया रिपोर्टर - नजीर मुलाणी यांनी मंत्री महोदयांचे विशेष आभार मानले आणि स्थानिक गरजांची माहिती दिली.यामुळे या भागातील नागरी सुविधा आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.