(मुलाणी -वसई )
भाईंदर, दि. ३० जुलै – मिरा-भाईंदर परिसरातील मराठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील हक्कांवर अन्याय झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिक तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करत फेरफार नोंदीद्वारे शेतकऱ्यांच्या नावाऐवजी खाजगी बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या नावाची नोंद सातबाऱ्यावर करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकारामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे हक्क गाजवला जात असून, या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर, आज दिनांक ३० जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता मेघा पार्टी हॉल, जुना पेट्रोल पंपजवळ, मिरा-भाईंदर रोड येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.या पत्रकार परिषदेत उपजिल्हाध्यक्ष हेमंत अनंत सावंत, शहर संघटक शशी मेंडन आणि शहर सचिव हरेश एकनाथ सुतार हे उपस्थित राहून प्रसारमाध्यमांसमोर संपूर्ण प्रकरण मांडणार आहेत.
पत्रकार बांधवांनी या परिषदेला उपस्थित राहून या ज्वलंत मुद्द्याला माध्यमातून वाचा फोडावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
==================================
🎉 हार्दिक अभिनंदन 🎉
सौ. निता सुळे मॅडम (अकलुज)
माळशिरस तालुका प्रतिनिधी
नियुक्ती दिनांक : २१ जुलै २०२५
---
उपस्थित मान्यवर :-
मुख्य संपादक
नजीर मुलाणी
(Mulani All India News - चैनल ) ( वेबसाईट - All india News . Online )
महाराष्ट्र प्रतिनिधी
ज .आय्याज तांबोळी (नातेपुते)
सोलापूर प्रतिनिधी
श्री .सचिन माने (अकलुज)
विशेष उपस्थिती
श्री .कृष्णा शिंदे
Mulani All India News परिवारात हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
No comments:
Post a Comment
Thanks for your