अपघात प्रकरणी आरोपीस शिक्षा - दहिवडी न्यायालयाचा निर्णय
दि . ८ जुलै २०२५ वार - मंगळवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] मुलाणी - दहिवडी ( खुटबाव )
दहिवडी, दि. 05 जुलै 2025 – दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत 17 मे 2022 रोजी घडलेल्या गंभीर अपघात प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा. श्री. एस.एस. गाडवे यांनी निर्णय देताना आरोपीस विविध कलमांन्वये दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात महेंद्र ज्ञानेश्वर वाघमारे (रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) याच्यावर गुन्हा रजि. नं. 118/2022 अन्वये भादवि कलम 304-अ, 279, 337, 338 व मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघातात उमाजी आप्पा नरळे व अजित शंकर नरळे, दोघे रा. पाणवण, ता. माण, जि. सातारा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
पोलिस तपासानुसार, आरोपीने MH 14 GH 4458 क्रमांकाच्या चारचाकी स्वीफ्ट गाडीने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवत मोटरसायकलस्वारांना धडक दिली होती. सदर घटनेची फिर्याद आप्पा दिगंबर नरळे (वय 50) यांनी दिली होती.
प्रकरणाचा कसून तपास महिला पो.ह.वा. डी.ए. डोईफोडे (ब.नं. 2169) यांनी केला. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील श्री. राजपूत यांनी युक्तिवाद सादर केला. न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब व दस्तऐवजीय पुरावे ग्राह्य धरून पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
🔸 भा.द.वि कलम 279 – 3 महिने सश्रम कारावास व ₹1000 दंड
🔸 भा.द.वि कलम 304-अ – 2 वर्षे सश्रम कारावास व ₹40000 दंड
🔸 भा.द.वि कलम 338 – 6 महिने सश्रम कारावास व ₹1000 दंड
🔸 मोटार वाहन कायदा कलम 184 – 2 महिने सश्रम कारावास
या खटल्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अश्विनी शेंडगे मॅडम तसेच स.पो.नि. डी.पी. दराडे (दहिवडी पोलीस ठाणे) यांनी मार्गदर्शन केले. प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पो.कॉ. विलास हांगे (ब.नं. 2473) यांनी खटल्यात सक्रिय सहकार्य केले.
=================================
====================================================="चैनल - Mulani All india News च्या सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली - सचिन माने ( अकलुज ) यांची ! उपस्थित मान्यवर मुख्य संपादक - नजीर मुलाणी , महाराष्ट्र प्रतिनिधी - आय्याज तांबोळी ( नातेपुते ) तसेच कृष्णा शिंदे त्यांची नियुक्ती व जिल्हा च्या धूरा संभाळण्याची जवाबदारी देण्यात आली आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच सचिन माने यांनी अभार वेक्त केले !आपल्या शहरातील बातम्या साठी संपर्क साधा -8796706999 (वेबसाईट -All india News.online ) तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा व जाहिराती साठी ही संपर्क करे
"धन्यवाद"
=================================
No comments:
Post a Comment
Thanks for your