All India News Mulani– नजीर मुलाणी ची रिपोर्ट
दि. १० जुलै २०२५ रोजी रात्री ९ :२० वाजण्याच्या सुमारास, मौजे शिंदी बुद्रुक (ता. माण) येथील जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक रस्त्यावर दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. बैंदूर सणानिमित्त बैलाची मिरवणूक सुरू असताना, दोन गटांमध्ये आपसात भांडण उफाळून आले.या घटनेची माहिती डायल ११२ वरून मिळाल्यानंतर, फिर्यादी राहुल बाळू मदने (वय ३४, पो.ह. दहिवडी पो.स्टे.) आणि अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थितांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी पोलिसांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून समोरासमोर भांडण करत गोंधळ घातला.या प्रकरणी प्रकाश चव्हाण, अविनाश जाधव, मल्हारी चव्हाण, कृष्णा माने, अक्षय मदने, संदेश मदने, व चैतन्य जाधव या सात जणांविरोधात गुन्हा र.नं. २२६/२०२५, भा.ज.सं. कलम १९४(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👮 गुन्हा दाखल वेळ – ११जुलै २०२५ रोजी पहाटे १.२७ वा.
📓 स्टेशन डायरी इंट्री नं. – ००३
👮♂️ प्रभारी अधिकारी – सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.पी. दराडे (मो. ९४२००२५७८०)
👮♂️ दाखल अंमलदार – पो.ह. १९८८ आर.एस. गाढवे (मो.८१०८५८००८८)
🕵️ तपास अधिकारी – पो.ह. २१२३ (मो.९४२००६५६३६ )या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.---
🖊️ मुलाणी की रिपोर्ट (मुख्य संपादक – नजीर मुलाणी ) All India News Mulani
जाहिराती साठी संपर्क करा :-८७९६७०६९९९/९३२५५२७३७०
No comments:
Post a Comment
Thanks for your