(मुलाणी )
म्हसवड : - शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया खताचा दर वाढवून तसेच इतर खतांचे लिंकिंग करून जबरदस्तीने विक्री करत शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी म्हसवड येथील बाप्पा कृषी सेवा केंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आणि खत नियंत्रण आदेश 1985 अन्वये कलम लावण्यात आले असून आरोपी मंगेश अशोक सावंत (रा. म्हसवड, ता. माण) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.घटना कशी उघडकीस आली?दि. 18 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद सातारा अंतर्गत जिल्हास्तरीय भरारी पथकाने म्हसवड येथील बाप्पा कृषी सेवा केंद्रावर तपासणी केली. यावेळी कृषी अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फरतडे, तसेच तालुका कृषी अधिकारी दहिवडी येथील श्रीमती शितल रामचंद्र घाडगे हे उपस्थित होते.तपासणी दरम्यान संबंधित विक्रेता युरिया खत प्रति गोणी 300/- रुपये दराने विक्री करत असल्याचे आढळले. यासोबतच शेतकऱ्यांना जबरदस्तीने इतर निविष्ठांची लिंकिंग करून विक्री केली जात होती. विक्री करताना आवश्यक कागदपत्रे, परवाने उपलब्ध नव्हते.शेतकरी व शासनाची फसवणूकशेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया खताचा अनुचित फायदा घेऊन जास्त दराने विक्री करून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी श्रीमती शितल घाडगे यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कायदेशीर कारवाईया प्रकरणी आरोपीवर अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3(2)(c), 3(3), 7 तसेच खत नियंत्रण आदेश 1985 मधील कलम 3(3), 5, 35(1)(a), बीएनएस 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कारवाईसदर आरोपीस अजून अटक करण्यात आलेली नसून अटक करण्याची तजवीज सुरु आहे. तपास पो. हवा. ब.नं. 1796 एन.एन. पळे यांच्या कडून सुरू आहे.---A P I सोनवणे, म्हसवड पोलिस ठाणे
No comments:
Post a Comment
Thanks for your