दहिवडी :- वडूज, दहिवडी, पुसेगाव, विटा, कराड परिसरात फसवणूक करणाऱ्या टोळीचा सक्रिय प्रयत्न — पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहनसातारा जिल्ह्यातील वडूज, दहिवडी, पुसेगाव, विटा, कराड या परिसरात काही दिवसांपासून "आम्ही पोलिस आहोत", "पुढे चेकिंग सुरू आहे", "तुमच्या जवळील मौल्यवान वस्तू एकत्र करून ठेवाव्यात" अशी बतावणी करून काही भामटे लोकांना हातचलाखीने फसवत आहेत. या संदर्भात दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनी दत्तात्रय दराडे यांनी परिसरातील सर्व ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, या टोळीचा प्रमुख निशाणा वयोवृद्ध लोकांवर असतो. अशा फसवणुकीच्या प्रकारामध्ये ते "पोलीस असल्याचे भासवत मौल्यवान वस्तू एकत्र करून ठेवण्यास सांगतात व त्यानंतर त्या वस्तू हातचलाखीने लंपास करतात." यापूर्वी देखील अशा घटना या परिसरात घडल्या असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.विशेषतः वयस्कर व्यक्तींनी अंगावर जास्त दागिने घालू नयेत. आपल्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुप, पोलीस पाटील यांच्यामार्फत ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना दागिने न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.याशिवाय आणखी एक फसवणुकीचा प्रकार म्हणजे "सोने पॉलिश करून देतो" असे सांगून घरात महिलांना फसवणे. अशा प्रकारे घरात शिरकाव करून मौल्यवान दागिने चोरून नेण्याच्या घटनाही घडत आहेत.नागरिकांनी पुढील बाबींची काळजी घ्यावी:
👉 अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नका.
👉 मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घ्या.
👉 संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिस स्टेशन वा पोलीस पाटील यांना कळवा."सतर्क रहा, सुरक्षित रहा." हा संदेश पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना देण्यात आला आहे.---
संपर्क:दत्तात्रय दराडे,सहायक पोलीस निरीक्षक,दहिवडी पोलीस ठाणे
No comments:
Post a Comment
Thanks for your