(मुलाणी )
म्हसवड (ता. माण, जि. सातारा) –ढाकणी गावातील नवनाथ दशरथ सूर्यवंशी या व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घरी वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्याच्या विरोधात भारतीय विद्युत अधिनियम सुधारणा 2003 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात फिर्याद सरकारी कर्मचारी संदीप अधिकराव थोरात (वय 39, रा. म्हसवड, ता. माण) यांनी दिली आहे. त्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 21/08/2024 ते 21/01/2025 या कालावधीत संशयित नवनाथ सूर्यवंशी यांनी वीज मीटरला बायपास करून बेकायदेशीरपणे वीज वापर केली. या गैरप्रकारामुळे 536 युनिट्स इतकी वीज चोरी करण्यात आली असून, त्याची एकूण किंमत ₹10,470/- इतकी आहे.सदर गुन्हा 04/08/2025 रोजी रात्री 9.27 वाजता म्हसवड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. संशयितास BNNS 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.घटनेची पाहणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे (मो. 9970717712) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलीस हवालदार डी. पी. खाडे (मो. 8999285455) हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.फिर्यादीने घटनास्थळाचा पंचनामा, वीज बिले, फोटो व असे समेंट शीट यांसह सर्व आवश्यक पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत. या घटनेने वीज चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत जनजागृती होण्याची गरज अधोरेखित झाली आहे.---अधिक माहितीसाठी संपर्क: सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे – 9970717712 तपासी अधिकारी पो. हवा. डी. पी. खाडे – 8999285455ऑल इंडिया न्यूज . ऑनलाईन
संपर्क करें -8796706999
No comments:
Post a Comment
Thanks for your