(मुलाणी )
धामणी (ता. माण) –चंदनाच्या झाडांची चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांना अवघ्या दोन तासांत अटक करत म्हसवड पोलिसांनी आणखी एक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, चंदन चोरीच्या या गंभीर प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपशीलवार माहिती:धामणी गावातील शेतकरी समाधान नागरगोजे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या शेतातील चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी चोरल्याप्रकरणी IPC कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ तपास सुरू केला. अत्यंत वेगाने आणि कुशलतेने तपास करत अवघ्या २ तासात चंदन चोरीचा गुन्हा उघड करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
अटक आरोपी:1. उमाजी उत्तम चव्हाण, रा. लोधवडे, ता. माण, जि. सातारा
2. प्रमोद अण्णा धोत्रे, रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा या आरोपींनी चंदन झाडे तोडण्यासाठी वापरलेली करवत व इतर साहित्य, तसेच चंदन लाकडे वाहून नेण्यासाठी वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीसाठी अर्ज करण्यात आला आहे.कामगिरीमागील पोलिसांची चमू:या यशस्वी कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई पार पडली. कारवाईत पुढील पोलिस अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिला:सहाय्यक पोलीस निरीक्षक -अक्षय सोनवणे , शहाजी वाघमारे ,देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार ,संजय आस्वले ,विनोद सपकाळ ,श्रीकांत सुद्रिक, राहुल थोरात, संतोष काळे ,महावीर कोकरे---ही कामगिरी स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने दिलासा दायक असून, चंदन चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी म्हसवड पोलिसांची तत्परता आणि दक्षता लक्षणीय आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your