(मुलाणी - खुटबाव )
"फक्त 5 तासांत ट्रॅक्टर चोराचा पर्दाफाश!"
म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 8.5 लाखांचा ट्रॅक्टर जप्त, आरोपी अटकेत
(मुलाणी - खुटबाव )
म्हसवड (ता. माण, जि. सातारा):हिंगणी येथून चोरीला गेलेला ट्रॅक्टर फक्त 5 तासांत परत मिळवून देत म्हसवड पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल झालेला ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी अनिल विष्णू माने (रा. हिंगणी, ता. माण) यांनी तक्रार दिली होती की, त्यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH 11 CW 3985) घराजवळून चोरीला गेला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या आधारे आरोपी धनाजी पुनाजी लोखंडे (रा. दिवड, ता. माण) याच्यावर संशय घेतला गेला. आरोपीला अटक करताच त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ट्रॅक्टर गोंदवले बुद्रुक येथील चिक्कूच्या बागेत लपवून ठेवला असल्याची कबुली दिली.
पोलीस पथकाने गोंदवले येथे जाऊन सदर चोरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला. ट्रॅक्टरची किंमत ₹8,50,000 असून, तो पुन्हा मिळाल्याने तक्रारदारास मोठा दिलासा मिळाला आहे.
या कामगिरीत सहभागी अधिकारी व अंमलदार:
अक्षय सोनवणे (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
शहाजी वाघमारे
अमर नारनवर
मैना हांगे
वसीम मुलाणी
विकास ओंबासे
संतोष काळे
मार्गदर्शन: -
तुषार दोशी (पोलीस अधीक्षक, सातारा)
वैशाली कडूकर (अप्पर पोलीस अधीक्षक)
रणजित सावंत (उपविभागीय पोलीस अधिकारी)
नागरिकांकडून पोलीस दलाचे अभिनंदन:
गुन्ह्याचा जलद तपास, चोरी गेलेली मालमत्ता त्वरित मिळवून देणे आणि आरोपीला ताबडतोब अटक यामुळे नागरिकांत समाधानाची भावना असून, म्हसवड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your