(मुलाणी )
पिंपरी : - माण तालुक्यातील मौजे पिपंरी येथे घरासमोर शेतकरी दाम्पत्यावर चुलत भावाकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण शिवाजी महानवर (वय 47, रा. पिपंरी, ता. माण, जि. सातारा) हे आपल्या पत्नी सौ. कौशल्या यांच्यासह दुध काढण्यासाठी जात असताना त्यांचा चुलत भाऊ तानाजी नारायण महानवर याने त्यांना अडवून शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी विरोध केल्यावर आरोपीने हातातील कळकाची काठी वापरून फिर्यादींच्या पाठी, हातावर, पायावर आणि खांद्यावर मारहाण करून जखमी केले.यावेळी फिर्यादींची पत्नी सौ. कौशल्या यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ व धमकी देण्यात आली. या घटनेनंतर म्हसवड पोलिस ठाण्यात गु.र.नं. 276/2025 भादंवि कलम BNS 118(1), 352, 351(2)(3) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हांगे (ब. नं. 466) हे करत असून, अधिक तपास सुरू आहे.==================================
चैनल - Mulani All india News
No comments:
Post a Comment
Thanks for your