(मुलाणी )
म्हसवड : - (ता.माण, जि. सातारा) दि.18 ऑगस्ट 2025म्हसवड पोलीस ठाण्यात चुलत भावाने लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दिनांक 17/08/2025 रोजी संध्याकाळी साडेसात वाजता मौजे पिपंरी (ता. माण) येथे घडला.फिर्यादी तानाजी नारायण महानवर (वय 42, रा. पिपंरी, ता. माण, जि. सातारा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या पत्नी व मुलांसोबत घरासमोर बोलत असताना मुलांना ओरडल्याचा गैरसमज करून चुलत भाऊ किरण शिवाजी महानवर (रा. पिपंरी, ता. माण) याने "तु मला शिव्या का देतोस" असा वाद घालत हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डाव्या हातावर व डोक्यावर मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीस दुखापत झाली.यावेळी आरोपीने फिर्यादी व त्यांची पत्नी जानकी यांना शिवीगाळ, दमदाटी व धमकी दिली. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 275/2025, BNS118(1), 352, 351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची नोंद पो.ना. हांगे (ब.नं.466) यांनी केली असून तपास पो.हवा. खाडे (ब.नं. 376, म्हसवड पोलीस ठाणे) करीत आहेत. या घटनेला भेट देणारे अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे
=================================