( मुलाणी )
भरधाव वेगात पिकअपची धडक – वृद्ध महिलेचा मृत्यू, एक जखमी; चालक फरार
माण , पळशी : - दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारे 06.15 वाजता मौजे पळशी, ता. माण, जि. सातारा येथील पिराची टेकडी देवीच्या मंदिराजवळील रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडला. गावातीलच बाळाबाई दत्तात्रय गंबरे (वय 68) व लताबाई हनुमंत खाडे (वय 60) या दोन महिला सकाळच्या वेळेस रस्त्याच्या साईड पट्टीने पायी चालत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या INTRA पिकअप (ज्यावर नंबर प्लेट नव्हती) ने त्यांना जोरदार धडक दिली.
अज्ञात चालकाने वाहन हयगईने, अविचाराने व निष्काळजीपणे चालवून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अपघात केला. धडकेनंतर वाहनचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात बाळाबाई गंबरे यांचा जागीच मृत्यू झाला असून लताबाई खाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या घटनेबाबत प्रकाश नाना खाडे (वय 48, रा. पळशी, ता. माण) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 अन्वये BNS 106(1), 106(2), 281, 125(A), 125(B), तसेच MV Act 184, 134(A)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास पोलीस उप-निरीक्षक वाघमोडे (मो. 9970970838) हे करीत आहेत. सदर घटनेतील आरोपी अद्याप अज्ञात असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.
सूचना: वाहनचालकांनी वाहन चालवताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घ्यावी, अन्यथा अशा गंभीर घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचे प्राण जातात.
================================== जाहिराती साठी आणि बातम्या साठी संपर्क करें -8796706999
No comments:
Post a Comment
Thanks for your