वसई उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाचे ठिय्या आंदोलन. - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani

मुस्लिम निकाह के लिए आज ही रजिस्ट्रेशन करे इस वेब साइट पर muslimnikah.onlin , अच्छे रिश्ते मिलेंगे इस साइट पर सबसे सस्ता वेबसाइट है ये कम पैसे में अच्छा रिश्ता मिलेगा

ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Tuesday, August 12, 2025

वसई उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाचे ठिय्या आंदोलन.

 दि . १२ ऑगस्ट २०२५ वार - मंगळवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
(मुलाणी )
वसई : वसईतील शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजा मार्फत सोमवारी उपविभागीय अधिकारी वसई यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जातीच्या दाखल्या वर हिंदू भंडारी असा अपूर्ण उल्लेख केल्यामुळे, तसेच त्यामुळे अनेक गैर अर्थ निर्माण होत असल्यामुळे शिवाय आपल्या समाजाच्या अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना उबाठा गटामार्फत, शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ, वसई यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले होते. याप्रकरणी आवश्यक प्रतिसाद प्रशासना कडून न मिळाल्यामुळे सदरचे आंदोलन छेडण्यात आले होते. अधिक माहितीनुसार, वसईत शेकडो वर्षांपासून हा समाज अस्तित्वात आहे. ऐतिहासिक उल्लेख असलेल्या या समाजाच्या जाती प्रमाणपत्रा बाबत प्रशासनाने सापत्न भूमिका घेत अपूर्ण उल्लेख केल्याप्रकरणी या समाजात संतप्त भावना निर्माण झाली आहे. शाळा सोडल्याचा दाखला देताना शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज असा उल्लेख शाळा प्रशासनाने केलेला आहे. तरीही प्रशासनाने नवीन दाखल्यात मे २०२५ पासून फेरबदल केलेले आहेत. या संबंधातली प्रकरणे उपविभागीय अधिकारी, वसई यांनी निकालात काढल्यामुळे तसेच प्राप्त दाखले हे हिंदू भंडारी असे उल्लेख केलेले असल्यामुळे शासनाला जाग यावी याकरता सदरची निवेदने करण्यात आली.
शासनाची ही चूक दुरुस्त करून घेण्यासाठी सदर कार्यालयाला अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत तरीही याबाबत आवश्यक कारवाई झालेली नाही. त्यामुळे सदर समाजातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटना यांनी एकत्रित येऊन ठिय्या आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलकांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केल्यावर त्यांनी आपली कैफियत सादर केली. याप्रकरणी शासनाने जानेवारी २०२५ मधे पारित केलेल्या शासन परिपत्रकात अपेक्षित नोंद नसल्यामुळे या विभागाने तशा स्वरूपाचे दाखले दिलेले आहेत. याबाबत ओबीसी विभागाकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांच्या पालकांना शासन दप्तरी खेटा माराव्या लागत आहेत. त्यामुळे या विरोधात सदरचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनास खाटीक समाजामार्फत पाठिंबा दर्शवण्यात आला. शिवसेना उबाठा गटाचे विनायक निकम प्रवीण म्हाप्रळकर, प्रथमेश राऊत, लोकसभा संघटक विवेक पाटील, जनार्दन पाटील,जनार्दन म्हात्रे, राजाराम बाबर, जयेश राऊत, मनसे तालुकाध्यक्ष प्रफुल ठाकूर , कुमार राऊत, ओंकार म्हात्रे, प्रकाश ठाकूर, रवींद्र राऊत आशिष राऊत, दिलीप म्हात्रे, देवेंद्र राऊत, हर्षद राऊत,केसरीनाथ राऊत, राजन पाटील, कुशल पाटील , किरण चेंदवणकर इत्यादी आंदोलक उपस्थित होते. याबाबत उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांना विचारणा केली असता, दाखल्यांबाबत अडवणूक होणार नाही परंतु, अपेक्षित ज्ञातीच्या नाम उल्लेखांबाबत शासनाकडे पाठपुरावा होणे आवश्यक आहे. उपलब्ध परिपत्रकात नोंद दुरुस्ती झाल्यासत्यानुसार दाखले देण्यात येतील अशी माहिती दिली आहे.
==================================

No comments:

Post a Comment

Thanks for your