(मुलाणी , वसई )
भिवंडी – महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना भिवंडी यांच्या वतीने खोणी ग्रामपंचायतमधील सफाई कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तसेच त्यांच्या विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी ठाम पावले उचलली जात आहेत.यासंदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती भिवंडी यांच्या विरोधात बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता पंचायत समितीच्या आवारात धरणा आंदोलन करण्यात येणार आहे.संघटनेचे भिवंडी शहर युनिट अध्यक्ष श्री. संतोष श्रीरंग साळवी यांनी सांगितले की, "कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांचे प्रश्न सोडविणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. जेव्हा प्रशासनाकडून अन्याय होतो, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून हक्कासाठी लढायला तयार आहोत."या आंदोलनासाठी सर्व===== संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.--
महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना – भिवंडी .खोणी ग्रामपंचायत सफाई कामगारांच्या अन्याया विरोधात धरणा आंदोलन📅 दिनांक: १३/०८/२०२५ (बुधवार)
⏰ वेळ: सकाळी १०.०० वाजता
📍 स्थळ: पंचायत समिती आवार, भिवंडी संघर्षासाठी चला, हक्कांसाठी उभे राहूया!
श्री. संतोष श्रीरंग साळवी
भिवंडी शहर युनिट अध्यक्ष
=====================