मो .8796706999
(महाराष्ट्र प्रतिनिधी - ज. आय्याज तांबोळी , नातेपुते )
नातेपुते (ता. माळशिरस) – नातेपुते पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मौजे फोंडशिरस (ता. माळशिरस) येथे धारदार शस्त्रांसह गावात दहशत माजवणाऱ्या दोन युवकांना रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईत तलवार, कोयता, कुकरी व रामपुरी चाकू असा धारदार शस्त्रांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे उमाजी नाईक चौक, फोंडशिरस येथे छापा टाकून आरोपींना पकडण्यात आले. अटक झालेल्यांची नावे —1. ओंकार राजेंद्र गोरे (वय २०)2. रोहित शंकर पारसे (वय २०)दोघे रा. फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.सदर गुन्ह्यात गु.र.नं. 280/2025, शस्त्र अधिनियम 1959 कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोना/५६२ राकेश लोहार करीत आहेत.नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मा. सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी आवाहन केले आहे की, कोणीही बेकायदेशीर अग्नीशस्त्र किंवा धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती द्यावी. अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोहेकॉ/१७०० बाबर, पोना/५६२ राकेश लोहार, पोना/१६२० निलेश बल्लाळ, पोकॉ/७६४ अमोल बंदुके, पोकॉ/२०५० अस्लम शेख, पोकॉ/५३२ रणजित मदने, चापोकॉ/डी-२० राहुल वाघमोडे आणि नवनाथ चव्हाण यांनी केली.
=========.=========================
शहारीत बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा :-8796706999
No comments:
Post a Comment
Thanks for your