(मुलाणी )
माण: - दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सध्या काही अनोळखी इसम मोबाईलवर बनावट बँकिंग SMS पाठवून आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल किंवा थेट फोन कॉल करून नागरिकांची फसवणूक करत आहेत.फसवणूक करणारे असे सांगतात की, "ट्रांजेक्शन करताना तुमच्या खात्यात चुकून पैसे आले आहेत", आणि नंतर भावनिक दबाव टाकून हे पैसे परत पाठवायला भाग पाडतात. काही प्रकरणांमध्ये हे पैसे थेट त्यांच्या मोबाईल क्रमांकावर घेतले जातात, तर काही प्रकरणांमध्ये फोन पे, गूगल पे स्कॅनर किंवा UPI आयडी देऊन व्यवहार करून घेतला जातो, ज्यामुळे नागरिकांची फसवणूक होते.नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
1. फेक बँकिंग SMS आल्यास त्यामधील “Available Balance” तपासा; प्रत्यक्षात पैसे आलेत का याची खात्री बँकेतून किंवा अधिकृत अॅपमधून करून घ्या.
2. समोरची व्यक्ती स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर पैसे न घेता दुसऱ्या व्यक्तीचा स्कॅनर/UPI आयडी देत असेल, तर ते शंकास्पद समजावे.
3. व्यापाऱ्यांनी ओळखीचा नसलेला ग्राहक दुकानात व्यवहार करताना प्रत्यक्ष रोख पैसे किंवा स्वतःच्या UPI वरच रक्कम स्वीकारावी. दुसऱ्या व्यक्तीच्या UPI वर पैसे पाठवायला सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.
4. ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार घडल्यास तात्काळ महाराष्ट्र सायबर हेल्पलाइन 1945 वर संपर्क साधावा.दहिवडी पोलिसांचे नागरिकांना आवाहन — कोणत्याही परिस्थितीत घाईघाईत व्यवहार करू नका, पडताळणी करूनच पैसे पाठवा. सावधान राहा, सुरक्षित राहा.
(दत्तात्रय दराडे)सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलीस स्टेशन
==================================
No comments:
Post a Comment
Thanks for your