नजीर मुलाणी
वसई : - वसई पश्चिम येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष तथा मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते वसई व नायगाव पट्ट्यातील बहुजन विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते तसेच महिलांनी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.यावेळी बोलताना नेते अविनाश जाधव यांनी, “माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून आपण सर्वजण मनसेत दाखल झाला आहात. जनतेसाठी खंबीरपणे उभे राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. राजसाहेबांचे विचार घराघरात पोहोचवा,” असे मार्गदर्शन केले.या मेळाव्यात वसईतील पदाधिकारी, पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, पालघर जिल्हा उपाध्यक्ष वितेंद्र पाटील, वाहतुक सेना पालघर जि . अध्यक्ष -विनोद मोरे , वसई-विरार शहरध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे वसई-विरार शहरांमध्ये पक्ष अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.विशेष म्हणजे वसई वेस्ट शहर संघटक म्हणून सुरेश जाधव यांना जबाबदारी देण्यात आली. ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष तसेच शहरध्यक्ष प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून शहरांमध्ये मनसेचे संघटन पुन्हा सक्रिय करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच नायगावचे प्रफुल कदम यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश करून राजसाहेबांच्या विचारांना बळ दिले.मेळाव्यात रानगाव येथील ग्रामपंचायत महिला सरपंच कमल वासुदेव घरत व स्थानिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. वसई स्टेशन परिसरातील फळ व्यापाऱ्यांनीही मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फळे भेट दिली.वसई - विरारशहराध्यक्ष प्रवीण भोईर यांनी आपल्या भाषणात, “आम्ही ठामपणे आपल्या पाठीशी आहोत. येणाऱ्या काळात वसईमध्ये मनसेचा झेंडा फडकवू. चला, आता जनतेच्या सेवेसाठी कामाला लागू आणि विकास मनसेचा दाखवू,” असे आवाहन केले.मेळाव्या मध्ये उपस्थि मनसे चे कट्टर मीडिया प्रतिनिधी नजीर मुलाणी आणि पंकज सावंत शेवटी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत मेळाव्याची सांगता करण्यात आली.