(मुलाणी )
नातेपुते : - दिनांक : २५ ऑगस्ट २०२५, सायं. ४.०० ते ७.४५ सोलापूर जिल्हातील नातेपुते शहर व परिसर नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ या दोन महत्त्वपूर्ण सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी काल दुपारी विशेष रूट मार्च काढण्यात आला.या रूट मार्च मध्ये नातेपुते शहरातील प्रमुख बाजारपेठा, एस.टी. स्टँड, संमिश्र वस्ती तसेच संवेदनशील भाग यांचा समावेश होता.---
दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिकरूट मार्च दरम्यान एस.टी. स्टँड, नातेपुते येथे दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.यामध्ये —
लाठीचार्ज,ढाल वापर,रायफल सराव,तसेच गॅस गनचे प्रात्यक्षिकयांचे थरारक व सुसंगत सादरीकरण पोलीस जवानांनी केले.यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी अधिक विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.---ग्रामीण भागातही जनजागृतीशहराबरोबरच नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे फोंडशिरस गावात देखील रूट मार्च व जनजागृती करण्यात आली.स्थानिक ग्रामस्थांना कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.---सहभागी अधिकारी व कर्मचारीया संपूर्ण उपक्रमात —
मा. श्री. महारुद्र परजणे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, नातेपुते पोलीस स्टेशन)
पीएसआय श्री. धनाजी ओमासे
१५ पोलीस अंमलदार
१ आरसीपी पथक
२४ होमगार्ड्स सक्रियपणे सहभागी झाले.---नागरिकांना आवाहन पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले की,
आगामी गणेशोत्सव २०२५
तसेच ईद-ए-मिलाद २०२५हे दोन्ही सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात व परस्पर सहकार्याने साजरे करावेत.---
कळावे
महारुद्र परजणे सहाय्यक पोलीस निरीक्षक,
No comments:
Post a Comment
Thanks for your