दि .१ सप्टेंबर २०२५ वार - सोमवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
(नजीर मुलाणी )
नातेपुते:- नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे आणि रोख रकमांचे प्रकरणे नोंदविण्यात आली होती. या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार व CCTV च्या मदतीने तपास करून विविध गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
यामध्ये सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल ₹4,97,000/- किमतीचा माल मूळ फिर्यादीस व मालकास परत करण्यात आला. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत :
1. गुरनं 133/2025 | BNS कलम 309(4), 3(5)
24,000/- किमतीचे 30 सोन्याच्या मण्यांचे पोत
24,000/- किमतीचे 92 मण्यांचे पोत
मालक : वैभव विठ्ठल आष्टी, रा. माळशिरस
2. गुरनं 105/2025 | BNS कलम 305(2), 331(4)
90,000/- किमतीची 30 ग्रॅम सोन्याची कंठी माळ
60,000/- किमतीचे 20 ग्रॅम सोन्याचे नेकलेस
30,000/- किमतीचा 10 ग्रॅम मिनी गंठण
9,000/- किमतीच्या सोन्याच्या रिंगा (3 ग्रॅम)
20,000/- किमतीची 5 ग्रॅम पिळ्याची अंगठी
20,000/- किमतीच्या सोन्याच्या कानातील रिंगा (5 ग्रॅम)
40,000/- किमतीची 7 ग्रॅम मनीमाळ
10,000/- रोख रक्कम
मालक : रामदास चंद्रकांत पवार, रा. नातेपुते
3. गुरनं 248/2025 | BNS कलम 304(2)
80,000/- किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (मालक : मंगल बळभीम अटकले, मौजे शेगाव, पंढरपूर)
40,000/- किमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे डोरले (मालक : सानिका रोहन गवळी, रा. सुकोडा, ता. अकोला)
20,000/- किमतीचे 4 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (मालक : सौ. सुनंदा लक्ष्मण सोनवळ, रा. नातेपुते)
यामध्ये विशेष बाब म्हणजे, सुनंदा सोनवळ या मूकबधिर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सहानुभूतीपूर्वक तपास करून त्यांचे मंगळसूत्र मूळ मालकास परत केले.
पोलिसांची कामगिरी :
सदर कामगिरी मा. अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), मा. प्रीतम यावलकर (अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), मा. संतोष वाळके (उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. महारुद्र बबन परजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत दिघे, PN लोहार, PN वाघमोडे, HC जमादार, HC रुपनवर, HC गोरे, PC सोमनाथ मोहिते, अमोल देशमुख, नवनाथ चव्हाण यांची विशेष भूमिका राहिली.
नागरिकांचा प्रतिसाद :
ही भव्य कामगिरी नातेपुते पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पार पडली. नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून परिसरात आनंदाचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your