(मुलाणी )
सातारा (ता. माण) – हिंगणी गावातील संतोष दगडू वाघमारे (वय 38) हे दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले असून ते अद्याप घरी परतले नाहीत. त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग क्र. 55/2025 प्रमाणे करण्यात आली आहे.बेपत्ता संतोष वाघमारे हे सावळ्या वर्णाचे, सडपातळ बांध्याचे, उंची सुमारे 5 फूट 5 इंच असून त्यांनी शेवटचे पांढरा फुल शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. ते मराठी भाषिक असून धंदा शेतीचा आहे.या प्रकरणी संतोष यांची पत्नी सौ. मंगल संतोष वाघमारे (वय 28, रा. हिंगणी, ता. माण, जि. सातारा) यांनी तक्रार दाखल केली आहे. तपासी अंमलदार मपो.हवा. हांगे (ब.क्र. 1832) हे तपास करीत आहेत. कोणाला संतोष वाघमारे यांच्याबाबत माहिती असल्यास म्हसवड पोलिस ठाणे (मो. 8055679141) येथे संपर्क साधावा.
--------------------------------------------
दु:खद निधन...
आपल्यातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व *ति.अरूणकाका गोडबोले* यांचे चिंतामणी नर्सिंग होम येथे दु:खद निधन झाले आहे... आज संध्याकाळी ५.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली..
अंत्ययात्रा बुधवार दि.१५।१०।२५ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांचे राहाते घर “आनंदी निवास” ६९,शनिवार पेठ, सातारा येथुन निघेल.
रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून सातारा भूषण पुरस्कार देणारे, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे, खिंडीतील गणपती देवस्थान ट्रस्टचे आणि समर्थ सेवा मंडळचे ट्रस्टी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, चित्रपट, सृष्टी, लेखन, पर्यटन, कला, क्रीडा, विज्ञान, बँकिंग तसेच सुप्रसिद्ध कर सल्लागार या सर्व क्षेत्रांमध्ये आपला वेगळा ठसा कायमच उमटवला होता. *आदरणीय श्री अरुण काका गोडबोले* यांना भावपूर्ण श्रद्धांजली