( मुलाणी )
म्हसवड (ता. माण) – सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या स्टाफकडून पुन्हा एकदा अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या माफियांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून तब्बल ₹27 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.घटनेचा तपशील:म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव ते देवापुर मार्गावर एक पिवळ्या रंगाचा डंपर ट्रक वाळूने भरून चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर डंपरचा पाठलाग करून शिरताव गावच्या लक्ष्मी देवी मंदिराजवळ त्याला अडवले असता, त्यात तीन ब्रास वाळू आढळून आली.पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:1. नितीन सुभाष लोखंडे, रा. विरकरवाडी, ता. माण, जि. सातारा2. अभिजीत संजय सावंत, रा. दिवड, ता. माण, जि. साताराडंपरसह वाळू असा एकूण 27,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.या कामगिरीत पुढील पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग:सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, संतोष काळे, विनोद सपकाळही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
==================================
🎉 हार्दिक अभिनंदन 🎉
सौ. निता सुळे मॅडम (अकलुज)
माळशिरस तालुका प्रतिनिधी
नियुक्ती दिनांक : २१ जुलै २०२५
उपस्थित मान्यवर : -
मुख्य संपादक
नजीर मुलाणी
(Mulani All India News)
महाराष्ट्र प्रतिनिधी
आय्याज तांबोळी (नातेपुते)
सोलापूर प्रतिनिधी
सचिन माने (अकलुज)
विशेष उपस्थिती
कृष्णा शिंदे
Mulani All India News परिवारात हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
No comments:
Post a Comment
Thanks for your