वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय येथे‘महाराष्ट्र दिन’ साजरा - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani

मुस्लिम निकाह के लिए आज ही रजिस्ट्रेशन करे इस वेब साइट पर muslimnikah.onlin , अच्छे रिश्ते मिलेंगे इस साइट पर सबसे सस्ता वेबसाइट है ये कम पैसे में अच्छा रिश्ता मिलेगा

ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Thursday, May 1, 2025

वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय येथे‘महाराष्ट्र दिन’ साजरा

वसई-विरार शहर महानगरपालिका 
मुख्य कार्यालय विरार
                                                                 दि.०१/०५/२०२५    
 
*वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘महाराष्ट्र दिन’ साजरा*
 
 दि . १ मे २०२५ वार गुरुवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ' वसई ]
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त आज दि.०१ मे, २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आला.
 महानगरपालिका मुख्यालयात मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांमार्फत राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले तसेच प्रतिज्ञा घेण्यात आली.
 याप्रसंगी मा.आयुक्त महोदयांनी केलेल्या आपल्या भाषणात सर्व नागरिकांना ‘महाराष्ट्र दिनाच्या’ व ‘कामगार दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिकेच्या काही महत्वाच्या योजनांबद्दल माहिती देताना मा.आयुक्त महोदयांनी सांगितले कि, महानगरपालिकेने मलनि:स्सारणाचे नवीन दोन प्रकल्प हाती घेतले असून यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नालासोपारा पश्चिम येथे ३४.५ द.ल.ली क्षमतेचा व रु.३२९ कोटीचा प्रकल्प तसेच नवघर-माणिकपूर येथे ४७ द.ल.ली. क्षमतेचा व रु.५०६ कोटीचा प्रकल्पाचा समावेश असून या दोन्ही प्रकल्पांना राज्य स्तरीय तांत्रिक समितीची मान्यता प्राप्त झालेली आहे व शासनाकडून लवकरच या कामांबाबतचा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे नालासोपारा पूर्व येथे तृतीय स्तरीय प्रक्रिया केंद्र उभारणीचा रु.६१ कोटीचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शहरात बांधकाम आणि विध्वंस कचरा (construction and demolition waste) प्रक्रिया केंद्र उभारणे बाबतचा प्रस्तावही शासनाला मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. अशाप्रकारे शासनाच्या भरीव योगदानातून व महानगरपालिकेच्या माध्यमातून जल-मलनि:स्सारण प्रकल्प राबविण्याचे काम सुरु आहे. 
 त्याचप्रमाणे शहरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने खोलसापाडा-२ धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून या रु.१३५ कोटीच्या प्रकल्पामधून महानगरपालिकेला २२ द.ल.ली. इतके पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या ह्या धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे खोलसापाडा-१ हा साधारणत: रु.२९० कोटीचा प्रकल्पही शासनाच्या निधीतून हाती घेण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. खोलसापाडा-१ प्रकल्पातून महानगरपालिकेला ४८ द.ल.ली. इतके पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे येत्या पावसाळ्यात पाणी तुंबून राहू नये यासाठी महानगरपालिकेमार्फत पावसाळीपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील मोठे, मध्यम, छोटे अशा एकूण २०५ नाल्यांच्या सफाईचे काम सुरु करण्यात आले असून मे महिनाअखेर पर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. 
 मागील वर्षी महानगरपालिकेमार्फत एकूण रु.३९३ कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात आला असून यासाठी मा.आयुक्त महोदयांनी सर्व नागरिकांचे आभार मानले. तसेच चालू वर्षीही लवकरात लवकर कराचा भरणा करून महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या ५% सवलतीचा फायदा नागरिकांनी घ्यावा. तसेच मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी कराचा भरणा लवकरात लवकर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मा.आयुक्त महोदयांनी केले.              
 या कार्यक्रमास मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, मा.प्रथम महापौर श्री.राजीव पाटील, सन्माननीय माजी सभापती, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, विविध पदाधिकारी, पत्रकार, मान्यवर नागरिक, पोलीस विभागातील कर्मचारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित 
मुख्य कार्यालय विरार 
वसई विरार शहर महानगरपालिका
==================================

No comments:

Post a Comment

Thanks for your