वसई : तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी विकासकाच्या घरात शिरून त्यांना धमकावल्याची घटना बोरिवलीतील कस्तुरबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनीगुन्हा क्रमांक ३२४ नुसार भारतीय न्याय संहिता २०४, २०५, ३५१(२), ३(५) नुसार समीर वर्तक सह चौघांवर गुन्हा नोंदवला आहे. अनिल गुप्ता (५१, रा. खुशल हेरिटेज, बोरिवली पूर्व) हे वसई-विरारमध्ये विकासक म्हणून काम करतात. २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी त्यांच्या घरी आलेल्या दोघांनी दिल्लीतील सीबीआयमधून आल्याचे सांगत चौकशीसाठी बिल्डिंगच्या खाली चला, असे सांगितले. अनिल यांनी त्यांना नकार दिला. अनिल यांनी त्यांच्या घरी येण्याचे कारण विचारले असता वसईतील रहिवासी समीर वर्तक यांनी तुमच्याविरोधात तक्रार दिल्याचे सांगितले. अनिल यांनी तक्रारीची प्रत मागताच त्यांनी एक कागद दाखवला. त्यावेळी वर्तक यांना ओळखत नाही, असे त्यांनी स्पष्ट करताच एकाने फोनद्वारे समीरला घेऊन ये, असे सांगितले. त्यानंतर दोघे तिथे आले. त्यापैकी एकाने सीबीआयचा अधिकारी, तर दुसऱ्या व्यक्तीची ओळख समीर वर्तक करून दिली.वसई-विरार महापालिका कार्यालयात समीरला पाहिले असून, तो तिथे माहिती अधिकार कार्यकर्ता अशी स्वतःची ओळख सांगत असल्याचे अनिल यांच्या लक्षात आले. वर्तक सोबत तुम्ही तडजोड करा, तसे न केल्यास तुम्हा अटक करू, अशी धमकी सीबीआय अधिकाऱ्याने त्यांना दिली. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्या व्यक्तींनी अनिल यांना धमकावत तुम्हाला जेलमध्ये खितपत पडावे लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर चौघेही तिथून निघून गेले. दरम्यान, त्यांचे चेहरे गुप्ता यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाले.अनिल यांनी याप्रकरणी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सीबीआय कार्यालयात तक्रार केली. त्यामुळे त्यांनी ती तपासासाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे वर्ग केली. याप्रकरणी गुप्ता यांनी २० जूनला कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार देत सीसीटीव्ही फुटेजही दिले आहेत. हा गुन्हा सुड बुद्धिने दाखल करण्यात आला असून याबाबत कायदेशीर रित्या आपण निर्णय घेणार असल्याचे समीर वर्तक यांनी सांगितले.
माहितीनुसार - रविवार 4:29
माझ्या व्हाट्सएप वरील मेसेज
सर्वांना नमस्कार,
कदाचित आपल्यापर्यंत माझ्यावर FIR झाल्याबद्दल माहिती येऊ शकते.
तरी पर्यावरणाची हानी केलेल्या व्यवसायिका विरुद्ध मी केलेल्या पर्यावरण विषयातील तक्रारी मुळे माझ्यावर सुडबुद्धीने हे झालेले असावे. मी स्वतः ही माहिती घेऊन कायदेशीरित्या योग्य तो निर्णय घेणार आहे.
तसेच माझी राजकीय प्रगती रोखण्यासाठी हे एक प्रकारचे षडयंत्र असावे.
समीर सुभाष वर्तक
No comments:
Post a Comment
Thanks for your