दि . ८ जून २०२५ वार - रविवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] वसई
प्रतिनिधी : सोमनाथ टोकरे ( पालघर )
दि. ८ पालघर लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट व्हावी, विशेषतः आदिवासी व मागास भागांतील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा तात्काळ व स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी ठोस पुढाकार घेतला आहे.सध्या जिल्ह्यातील पालघर जिल्हा रुग्णालय व मनोर ट्रॉमा सेंटर या दोन महत्त्वपूर्ण आरोग्य प्रकल्पांचे कामे निधीअभावी रखडली आहेत. या संदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्री मा. सौ. मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांना डॉ. हेमंत सवरा यांनी सविस्तर लेखी निवेदन सादर केले आहे.डॉ. सवरा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की,“पालघर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरी, सागरी व ग्रामीण रचनेचा आहे. येथे आदिवासी व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाण मोठे आहे. तातडीच्या वैद्यकीय सेवेच्या अभावामुळे अनेकांना मुंबई किंवा ठाणे गाठावे लागते, जे वेळखाऊ व खर्चिक ठरते. पालघर रुग्णालय आणि मनोर ट्रॉमा सेंटरची कामे पूर्ण झाल्यास हजारो नागरिकांना स्थानिक पातळीवर उपचाराची सुविधा मिळेल.”खासदार डॉ. सवरा यांनी निवेदनात खालील मुद्द्यांवर भर दिला आहे: 1. दोन्ही प्रकल्पांचे आर्थिक पुनरावलोकन करून आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा. 2. रखडलेली कामे पूर्ण करून आरोग्य सेवा नागरिकांना समर्पित करावी. 3. आदिवासी भागासाठी विशेष धोरणात्मक उपाययोजना राबवाव्यात.
No comments:
Post a Comment
Thanks for your