भाईंदर : - महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून तिसरी भाषा लादलीच. ती ही हिंदी ! मागच्या शासननिर्णयातील “अनिवार्य” हा शब्द काढून “सर्वसाधारण” असा शब्द घेतला आहे. हा कावा मराठी माणसानं वेळीच ओळखला पाहिजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळा मुख्याध्यापकांना मराठी भाषेसाठी पत्र लिहल असून आज मिरा भाईंदर शहरातील विविध शाळेमधील मुख्याध्यापक ह्यांना पत्र देऊन आपलं मराठीपण टिकवायचं तर मोठी लढाई लढावी लागेल. या लढाई मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रेसर असेलच पण शाळा मुख्याध्यापक म्हणून आपणही हिंदी भाषा शिकवणार नाही हे शासनाला ठामपणे सांगून मराठीच्या बाजूने उभे राहाव मनसे ही आपल्या पाठीशी खंबीर उभी आहे ही विनंती करण्यात आली.
Raj Thackeray Amit Thackeray
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत MNS Adhikrut
=================================
No comments:
Post a Comment
Thanks for your