सर्व सामान्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरणाऱ्या नायब तहसीलदारा विरोधात आक्रोश.
उपविभागीय अधिकाऱ्यांचे कारवाईचे निर्देश.
वसई : -वसई तहसीलदार कार्यालयामध्ये कार्यरत असलेले नायब तहसीलदार शशिकांत नाचण यांच्या विरोधात विविध पक्षाचे पदाधिकारी , सामाजिक संघटना यांनी लेखी निवेदन मंगळवारी सकाळी सादर केले.
सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून जाणीवपूर्वक नागरिकांची कामे प्रलंबित ठेवल्याप्रकरणी, पुरवठा विभागाचा तात्पुरता कार्यभार असताना संशयास्पद शिधापत्रिका मंजूर केल्याची प्रकरणे, नवीन कार्यभार स्वीकारणाऱ्या तलाठ्यांना डीएलसी ची पूर्तता हेतू पुरस्सर करून न देणे असे गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आले आहेत.
नायब तहसीलदार नाचण हे अभ्यंगताना उद्धट व अरेरावेची भाषा करतात जाणीवपूर्वक कामे खोळंबून ठेवतात. मागील अडीच वर्षांपासून त्यांच्याकडे प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रलंबित कामाची झाड झडती घेण्यात यावी, स्थानिक भूमिपुत्रांनी त्यांच्या जमिनीच्या कामासंदर्भात योग्य दस्तावेज देऊनही जाणीवपूर्वक कामे केली जात नाहीत. बिल्डर लॉबीशी आर्थिक व्यवहार करून आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाईची मागणी शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी वसई यांच्याकडे केली आहे.
'वरिष्ठांना तक्रार केली तरी आपल्याला फरक पडत नाही' असा पावित्रा घेणाऱ्या नाचण यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी उपस्थित असलेले तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिले.
सदर निवेदनानुसार नाचण यांच्यावर कारवाई करून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.
सदर बाबत नायब तहसीलदार शशिकांत नाचण यांना विचारणा केली असता, तालुक्यातील तलाठ्यांना पदभार दिलेला आहे तसेच डी एल सी प्रक्रिया पूर्ण केली आहे. अशी माहिती दिली आहे. याबाबत येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात काळे झेंडे दाखवून कारवाई करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर श्रेष्ठ मंडळात मनसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत धोंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक, उद्धव सेनेचे विभाग प्रमुख दत्ता जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय कदम, एलायस डिसिल्वा,
भाजपा उपाध्यक्ष निलेश वर्तक इत्यादी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याबाबत उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांना विचारणा केली असता, तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांचे
दालनाचे दरवाजे काढण्यात येतील. वातानुकूलित यंत्रे यापुढे त्यांना वापरता येणार नाही तसेच खाजगी इसम कामकाजासाठी असल्यास त्यांच्यावरही निर्बंध आणले जातील अशी प्रतिक्रिया दिली आहे.
==================================
जाहिराती साठी संपर्क करें मो . नं . .8796706999/9325527370 स्केन करा बातमी पहा All india News Mulani
आपल्या शहरातील घडामोडी
No comments:
Post a Comment
Thanks for your