आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ! - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Thursday, June 12, 2025

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान !

पालघर जिल्ह्यात १५ जूनपासून जनजागृती मोहिमेला प्रारंभ 
दि . १२ जून २०२५ वार - गुरुवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] वसई  
प्रतिनिधी - सोमनाथ टोकरे
 -पालघर, दि. १२ जून : आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तिकरणासाठी केंद्र शासनाच्या वतीने 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ गावपातळीवर उपलब्ध करून देणे होय. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.पालघर जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत विविध तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे. जव्हार – १०७, मोखाडा – ५३, विक्रमगड – ९३, वाडा – ८७, पालघर – ९२, तलासरी – ३७, डहाणू – १६३ आणि वसई – २२ या गावांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.या मोहिमेदरम्यान गावांमध्ये शिबिरे आयोजित करून नागरिकांना खालील सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत:आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणीजात प्रमाणपत्र व इतर शासकीय दस्तऐवजपीएम किसान योजना व जनधन खाते उघडणीई-सेवा सुविधासिकलसेल आजारासंदर्भात जनजागृतीयाशिवाय आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, महसूल आदी विभागांमार्फत विविध लाभ योजना प्रत्यक्ष दिल्या जाणार आहेत.या अभियानामुळे आदिवासी समुदायाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी व्यक्त केला असून, सर्व संबंधित विभागांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत

No comments:

Post a Comment

Thanks for your