राजोडीमधील शासकीय जागेचीबनावट आकारफोड पत्रक व नकाशाची प्रत बनवली. * वसई भूमि अभिलेख मधील भूमापकाचा प्रताप. - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani

मुस्लिम निकाह के लिए आज ही रजिस्ट्रेशन करे इस वेब साइट पर muslimnikah.onlin , अच्छे रिश्ते मिलेंगे इस साइट पर सबसे सस्ता वेबसाइट है ये कम पैसे में अच्छा रिश्ता मिलेगा

ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Monday, July 14, 2025

राजोडीमधील शासकीय जागेचीबनावट आकारफोड पत्रक व नकाशाची प्रत बनवली. * वसई भूमि अभिलेख मधील भूमापकाचा प्रताप.


दि . १४ जुलै २०२५ वार - सोमवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]      मुलाणी , वसई
वसई : शासनाची नवीन अटी शर्तीची जमीन लाटून त्याचा विक्री करून व्यवहार करणाऱ्या भूमाफियांना वाचवण्यासाठी भूमि अभिलेख, वसई कार्यालयातील परीक्षण भूमापक संदीप जाधव यांनी बनावट आकारफोड पत्रक व नकाशाची प्रत बनवून माहिती अधिकारात सादर केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आधीच सदर कार्यालय गैरगोष्टीमुळे अनेकदा चर्चेत आले आहे. त्यात या नवीन प्रकरणामुळे आणखी खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या सदर गैर कायदेशीर कृत्या बाबत त्यांना नोटिस बजावून खुलासा मागितला आहे. तसेच माहिती व लॅपटॉप तात्काळ कार्यालयात जमा करण्याचे निर्देश आता दिले आहेत. अधिक माहिती नुसार, गांव मौजे राजोडी येथील सर्वे क्रमांक २२० पोट हिस्सा मो. र. नं. ९२९४/२०२३ ची संचिका २ वर्षापासून कार्यालयात जमा केलेली नाही. ही जमीन काही भूमाफियानी लाटून त्यावर बंगले बांधून विक्री व्यवहार केले. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी, पालघर यांच्याकडे चौकशी दावा सन २०२३ पासून सुरु आहे. तरीही त्याची कायदेशीर कागदपत्रे नसतानाही भूमि अभिलेख वसई कार्यालयाने नकली दस्त तयार केले. विशेष म्हणजे सदर जमीन बफर झोन, कांदळवन क्षेत्र तसेच सीआरझेड मधे आहे. त्यामुळे कुठल्याच सक्षम प्राधिकरणाचे आदेश नसतानाही या जमिनीचा नकाशा व पोट हिस्सा बनवण्यात आला. यात तुकडा बंदी कायदा १ कलम ९४७ चे ही सरळ उल्लंघन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उपसंचालक, भूमि अभिलेख, कोकण विभाग मुंबई मार्फत चौकशी सुरु असून यातील मुख्य संशयित भूमापक संदीप जाधव यांना नोटिस बजावण्यात आली आहे. या प्रकरणा नंतर जाधव यांची लगेच कर्जत येथे बदली झाली आहे. त्यामुळे संपुर्ण प्रकरणात मोठी धेंडं असण्याची शक्यता आहे. शासनाची फसवणूक करून, शासन महसूल बुडवून शासनाचीच जमीन लाटून त्यावर विक्री व्यवहार करणाऱ्या वसईतील सदर भूमाफियांना वाचवण्यासाठी शासकीय अधिकारी किती प्रयत्नशील असतात त्याचे हे प्रकरण उदाहरण ठरले आहे. याबाबत अमोल बदडे उपधीक्षक , भूमि अभिलेख वसई यांना विचारणा केली असता, त्यांनी दिलेल्या माहिती नुसार भूमापक संदीप जाधव यांना नोटिस बजावली असून त्यांच्या सर्वच प्रकरणाची चौकशी होणार आहे. कागदपत्रे जप्तीसाठी आदेश काढण्यात येतील. त्याचा अहवाल तयार होईल. रेकॉर्ड रूम मधील सर्व प्रकरणे काढण्यास सांगितले आहे. अशी माहिती बदडे यांनी दिली आहे.शासकीय दप्तरी याबाबतची माहिती उपलब्ध नसतानाही सदरची माहिती कशी उपलब्ध झाली हाच मोठा घोळ असल्याची प्रतिक्रिया सदर प्रकरण बाहेर काढणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली
================.==================

No comments:

Post a Comment

Thanks for your