(मुलाणी ' वसई )
भाईंदर :- भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयामधील गंभीर परिस्थिती समोरभारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात नियमित डॉक्टर गैरहजर राहतात, तसेच डॉक्टरांची तीव्र कमतरता असल्याने अनेक गरीब व गरजू रुग्ण योग्य उपचारांपासून वंचित राहत आहेत. रुग्णालयातील सिस्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी यासंबंधी अनेक वेळा तक्रार करूनही वैद्यकीय आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची भरती करण्यात अजूनही अपयश आले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयास भेट दिली असता रुग्णांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयात डॉक्टर्सची अनुपस्थिती आणि व्यवस्थेतील हलगर्जीपणा यामुळे रुग्णांना जीव मुठीत घेऊन उपचारासाठी ताटकळत बसावे लागत आहे.म.न.से. शिष्टमंडळाने वैद्यकीय विभागास सोमवारी डॉक्टर रुजू न झाल्यास घेराव घालण्याचा इशारा दिला असून, या गैरजबाबदार व्यवस्थेला जाब विचारला जाईल.सदर भेटीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष श्री. हेमंत सावंत, शहर संघटक श्री. शशी मेंडन, शहर सचिव श्री. हरेष सुतार, माथाडी कामगार उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.श्री रमाकांत माळी सहचिटणीस, शारीरिक सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना
All India News.online
No comments:
Post a Comment
Thanks for your