16 ऑगस्ट 2025 वार - शनिवार [मुख्य संपादक नजीर मुलाणी ]
(मुलाणी )
✍️ All india News Mulani. onlice
म्हसवड – स्वातंत्र्यदिन 2025 च्या निमित्ताने म्हसवड पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना एक अनोखी व कौतुकास्पद भेट देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तब्बल 61 हरवलेले व चोरीचे मोबाईल फोन, एकूण 16 लाख रुपये किमतीचे, शोधून काढून मूळ मालकांना परत केले आहेत.हे यश मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.गेल्या सहा महिन्यांतच सोनवणे यांच्या पथकाने एकूण 21 लाख रुपयांचे 78 मोबाईल फोन शोधून परत केले आहेत, ही कामगिरी खरोखरच उल्लेखनीय आहे.अक्षय सोनवणे यांनी सांगितले की, “नागरिकांचा विश्वास परत मिळवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डिजिटल यंत्रणांचा वापर, स्थानिक गुन्हे शाखांची मदत आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे ही कामगिरी शक्य झाली.”या उपक्रमामुळे पोलीस व सामान्य नागरिक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ होणार आहेत.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने म्हसवड पोलीस ठाण्याची ही जनतेला दिलेली भेट समाजापुढे एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे.
आपल्या शहरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा -8796706999