दि . १८ सप्टेंबर २०२५ वार - गुरुवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
(मुलाणी )
दहिवडी : -(ता. माण) –भांडवली (ता. माण) येथे 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी सव्वा एका वाजण्याच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यक्तीला बौद्धविहार परिसरात जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी गणेश शामराव खरात (वय 41, रा. भांडवली, जात: महार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विक्रम अतुल सुर्यवंशी याने जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना जबर मारहाण केली. आरोपीने "गावात राहण्याची लायकी नाही, महारड्यांना गावातून बाहेर काढले पाहिजे" अशा शब्दात धमक्या दिल्या.
या घटनेत फिर्यादीला पाठीवर जखमा झाल्या असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता कलम 115(2), 352, 351(2) तसेच SC-ST अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 – कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा दाखल करताना पो.ना. म्हामणे (दहिवडी पोलीस ठाणे) यांनी पंचनामा केला असून तपासाची जबाबदारी मा. रणजीत सावंत (SDPO, दहिवडी) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
///////////////////////////////////////
न्युज आणि जाहिराती साठी संपर्क करे -8796706999