(मुलाणी )
दहिवडी : - "रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चाताप देतो – संयम ठेवा, संयम वाचवतो."दहिवडी (ता. माण, जि. सातारा) –जनावरे शेतात चारायला आणू नयेत या किरकोळ वादातून दहिवडी परिसरात जीवघेणा प्रकार घडला आहे. प्रसाद नितिन साखरे (रा. खताळवस्ती, दहिवडी) याने कोयत्याने विश्वास ज्ञानदेव खांडे (वय 46, रा. खांडेवस्ती, दहिवडी) यांच्यावर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.घटना 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3:15 वा. माऊली हॉटेलसमोर घडली. विश्वास खांडे व त्यांचा मित्र अरुण खताळ हे ट्रॅक्टरने मका घेऊन जात असताना आरोपीने कॉलरमधून कोयता काढून “जनावरे शेतात का आणतोस” असा वाद घालत त्यांच्यावर डोक्यावर, दोन्ही पायावर व हाताच्या बोटांवर वार केले.या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 319/2025, BNS कलम 109, 351(2) नुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली आहे.तपास अधिकारी: म.पो.उनि. सी.एस. मोटे (मो. 8087339547)दाखल अंमलदार: पोलीस नाईक 1928 म्हामने