(मुलाणी - खुटबाव )
दहिवडी :- सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस ठाण्याने ‘CEIR पोर्टल’ या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.माननीय तुषार जोशी (पोलीस अधीक्षक, सातारा), मा.वैशाली कडुकर (अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा), रणजीत सावंत (उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कम्प वडूज) यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहिम राबवण्यात आली.प्रभारी अधिकारी श्री. दत्तात्रय दराडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहिवडी पोलीस ठाणे) तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांनी सातत्याने प्रयत्न करत जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत हरवलेले ७७ मोबाईल शोधून काढले. या मोबाईलची एकूण किंमत तब्बल ₹१५ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.हरवलेले मोबाईल हे राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हैदराबाद, जामखेड , उस्मानाबाद, सांगली, पंढरपूर, मुंबई, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर अशा राज्यांतून हस्तगत करण्यात आले. हे मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले असून त्यांचा आनंद द्विगुणित झाला.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दहिवडी पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करत माननीय पोलीस अधीक्षक सातारा व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अधिकृत पत्राद्वारे अभिनंदन केले.या मोहिमेत पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन , पोलीस स्टेशनचे राजेंद्र सावंत्रे व पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. दहिवडी पोलीस ठाण्याच्या या उपक्रमामुळे सातारा जिल्हा ‘ CEIR पोर्टल’ कामगिरीत संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे .
/////////////////(///////////////////
No comments:
Post a Comment
Thanks for your