--------------------------------------------
म्हसवड :- (ता.माण, जि. सातारा)दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी म्हसवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.फिर्यादी हेमलता जोतीराम कवडे (वय 48, व्यवसाय – घरकाम, रा. म्हसवड) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून सलाउद्दीन जमीरदिन उद्दीन काझी (रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याची हकिकतसन 2014 च्या जानेवारी महिन्यात, आरोपी सलाउद्दीन काझी यांनी नगरपरिषद, म्हसवड यांच्याकडून घेतलेला अपूर्ण उतारा खरा असल्याचे भासवून, फिर्यादीकडून दुकान खरेदीसाठी तब्बल ₹2,40,000/- रुपये घेतले.आरोपीने फिर्यादीला 08 नंबरच्या दुकान गाळ्याची (क्षेत्रफळ 7.28 चौ.मी.) विक्री केल्याचे दाखवले. मात्र संबंधित दुकान गाळा प्रत्यक्षात बांधकामात अस्तित्वात नसल्याचे नंतर उघड झाले. त्यामुळे फिर्यादीची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. गुन्हा नोंद गुन्हा क्र. 298/2025कायदे कलमे : BNS 420, 465, 467, 468, 471 प्रमाणेगुन्हा दाखल तारीख व वेळ : 10/09/2025 रोजी रात्री 11.22 वाजतागुन्ह्याचा प्रकार : फसवणूकअटक : आरोपीविरुद्ध अटकेची तजवीज ठेवण्यात आली आहेतपास या प्रकरणाचा तपास एन.एन. पळे (पो.हवा.1796) हे अधिकारी करीत आहेत.संपर्क क्रमांक : 9764236308या प्रकरणामुळे म्हसवड परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your