दि . 11 सप्टेंबर 2025 वार - गुरुवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
( मुलाणी )
म्हसवड पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता, मौजे मसाईवाडी, ता. माण, जि. सातारा येथे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी गावात पाणी वाटपाचे शासकीय कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली.
फिर्यादी आनंदा पांडुरंग नाळे (वय 45, व्यवसाय नोकरी, वॉलमन, रा. दहिवडी, ता. माण) यांच्यासह सहकारी प्रवीण सुरेश पिसे पाणी वाटपाचे काम करीत होते. त्यावेळी शावबा मारुती विरकर (रा. मसाईवाडी, ता. माण, जि. सातारा) यांनी "तुम्ही आम्हाला पाणी का देत नाही? गावात पाणी कसे वाटता ते बघतो" असे म्हणत शिवीगाळ केली.
यानंतर आरोपीने दगडफेक करून फिर्यादी नाळे यांच्या पाठीवर व प्रवीण पिसे यांच्या डोक्यावर वार केला. तसेच कानाखाली मारून त्यांना दुखापत करून शासकीय कामात अडथळा आणला.
या प्रकरणी गु.र.नं. 297/2025, भा.दं.सं. (BNS) कलम 132, 121(1), 125, 351(2)(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन.एन. पळे (मो. 9764236308) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
----------------- ----------++++
( नजीर मुलाणी – All india news.online )
(ऑल इंडिया न्यूज डॉट ऑनलाईन )