वसई- विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचार ? – मनसेचे जयेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप! - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani

मुस्लिम निकाह के लिए आज ही रजिस्ट्रेशन करे इस वेब साइट पर muslimnikah.onlin , अच्छे रिश्ते मिलेंगे इस साइट पर सबसे सस्ता वेबसाइट है ये कम पैसे में अच्छा रिश्ता मिलेगा

ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Monday, September 15, 2025

वसई- विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचार ? – मनसेचे जयेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप!

दि .१५ सप्टेंबर २०२५ वार - सोमवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]   
 ( मुलाणी , वसई )
वसई विरार –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील साहेब यांनी वसई- विरार शहर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप करत प्रशासनावर बेधडक टिका केली आहे.त्यांनी सांगितले की, “महानगरपालिकेतील चार जणांना निलंबित करूनही पुन्हा कामावर घेतले गेले. इतकंच नव्हे तर  सहा - आयुक्त गणेश पाटील यांनाही तिसऱ्यांदा निलंबित करावं लागलं. मग हे अधिकारी वारंवार कामावर कसे रुजू केले जात आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.नवीन आयुक्तांकडून अपेक्षा नवनियुक्त आयुक्त - मनोज सूर्यवंशी साहेब आता ह्या भ्रष्टाचाराला आळा घालतील का, की पूर्वीप्रमाणेच “मिळून-मिसळून” सर्व चालणार, असा सवाल पाटील यांनी केला. लोक दरबार की निवडणूक स्टंटबाजी?पुढे बोलताना पाटील म्हणाले की, “जनता दरबार म्हणजे लोक दरबार हे केवळ इलेक्शनसाठीचे स्टंट आहेत. कारण त्या दरबारात सर्व बॅनरबाजी पक्षाची असते, आणि त्याच पक्षाचे लोक उपस्थित असतात. मग सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले जाणार कसे?”त्यांनी मंत्री व आमदारांवरही सडकून टिका केली. “हे लोक गाडीतून हायवेवरून येतात, पण त्याच हायवे वर पाणी साचलेले असते, गावोगाव पूरस्थिती असते, तरी त्याकडे डोळेझाक केली जाते. फक्त स्टंटबाजी होते, प्रत्यक्षात लोकांची अडचण सोडवली जात नाही.”ईडी चौकशीची मागणी जयेंद्र पाटील यांनी थेट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करत सांगितले की, “माजी आयुक्त अनिलकुमार पवार  यांच्यावर ईडीने छापा टाकून चौकशी केली होती. त्यातून भ्रष्टाचाराचे गंभीर पुरावे समोर आले. मग इतर अधिकारी तपासातून सुटतील का? महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली तर खालच्या अधिकाऱ्यांपासून मोठ्या अधिकार्‍यांपर्यंत सगळेच उघडे पडतील.”त्यांनी आरोप केला की, अनधिकृत बांधकामावर कारवाई न करता अधिकाऱ्यांनी माया जमवली, त्यामुळे “सरकारी तिजोरीत पैसा जाण्याऐवजी तो थेट अधिकाऱ्यांच्या खिशात गेला. मग याला जबाबदार कोण?”मनसे चा इशारा  मनसे पालघर लोकसभा अध्यक्ष - जयेंद्र पाटील यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला आळा बसला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन उभारेल.”

No comments:

Post a Comment

Thanks for your