दि . ७ ऑक्टोंबर २०२५ वार - मंगळवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
(मुलाणी , खुटबाव)
नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) –
नातेपुते पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने फक्त काही दिवसांत 6,200 रुपये हिसकावून पळालेल्या दोन चोरांना थार वाहनासह अटक करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या आरोपींवर कोल्हापूर, सांगली व धाराशिव जिल्ह्यांमध्येही चोरी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
घटनेचा तपशील :
दि. 01 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सुमारास फलटण–पंढरपूर रोडवरील इंडियन ऑईल कंपनीचा सुळ पेट्रोल पंप येथे ही घटना घडली.
फिर्यादी दीपक जनार्दन चव्हाण (रा. मोराची, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याचे काम करीत असताना राखाडी रंगाची थार गाडी (क्र. MH-06-CG-5558) आली. गाडीतील एका व्यक्तीने “4,000 रुपयांचे डिझेल भरायचे आहे आणि 6,200 रुपये रोख हवे आहेत, मी 10,200 रुपये फोन पेवर पाठवतो” असे सांगून फिर्यादीची फसवणूक केली.
फिर्यादी पैसे मोजत असताना गाडीत बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या हातातील 6,200 रुपये हिसकावून घेत पळ काढला. याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 345/2025 भारतीय दंड संहिता कलम 304(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास आणि अटक :
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कदम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरील व आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला तसेच सायबर शाखेच्या तांत्रिक सहाय्याने आरोपींचा शोध घेतला.
तपासादरम्यान आरोपी बारामतीकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने नातेपुते पोलिसांनी मालेगाव (बारामती) पोलीस ठाण्याच्या मदतीने दोन आरोपींना ताब्यात घेतले —
1️⃣ आकाश प्रकाश शिंदे (वय 24, रा. सावकार गल्ली, मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
2️⃣ नवनाथ किसन सरगर (वय 30, रा. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली)
दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर यापूर्वीही चोरी आणि दरोड्याचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
जप्त मुद्देमाल :
पोलीसांनी 10,00,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये
महिंद्रा थार वाहन,
मोबाईल फोन,
तसेच रोख रक्कम यांचा समावेश आहे.
सदर आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस लॉकअपमध्ये आहेत.
उत्कृष्ट कामगिरी :
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी,
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर,
उपविभागीय पोलीस अधिकारी (अकलूज) श्री. संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कदम,
पोलीस हवालदार धनाजी शेळके,
पोलीस नाईक अमोल वाघमोडे, राकेश लोहार, मनोज शिंदे, रंजीत मदने, दिनेश रणवरे, जावेद आतार (नातेपुते पोलीस ठाणे), तसेच सायबर शाखेतील जुबेर तांबोळी यांनी केली.
ही धडक कामगिरी नातेपुते पोलिसांच्या दक्षता आणि तत्परतेचे उदाहरण असून, नागरिकांत समाधानाची भावना निर्माण झाली आहे.