(मुलाणी , वसई )
मेहतर समाजाचा पुढाकार – जीवनावश्यक शिधावाटपाने सामाजिक बांधिलकी जपली
पंढरपूर –सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद साहेब यांनी सामाजिक संस्थांना पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था (मेहतर समाज), पंढरपूर यांनी आदर्शवत पाऊल उचलले आहे.
संस्थेने नवरात्र उत्सवातील इतर खर्च टाळून आणि समाज स्थापनेच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवाचा खर्च वाचवून, तो निधी पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. समाजातील बांधवांनी एक दिवसाचा पगार खर्च करून, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या शिधा वाटपाद्वारे सामाजिक बांधिलकी जपली.
संस्थेच्या बैठकीत गहू पीठ, तांदूळ, साखर, चटणी, गोडतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. “आम्हीही पूर्वी पुरग्रस्त राहिलो आहोत, त्यामुळे त्या वेदनेची जाणीव आहे,” असे मत या बैठकीत व्यक्त झाले.
या निर्णयानुसार माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पूरग्रस्त कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आले. शिधा वितरणावेळी गावातील माता-भगिनींनी पूरात सर्व काही वाहून गेल्याची व्यथा सांगताना भावनिक क्षण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन यांचे पदाधिकारी — गुरु दोडिया, काशिनाथ सोलंकी, महेश गोयल, अंबादास गोयल, आदित्य मेहडा, योगेश मेहडा, सुरेश गोवर्धन वाघेला, दीपक वाघेला, विक्रम वाघेला आणि प्रमोद मेहडा उपस्थित होते
---------------------------------------------