(मुलाणी , वसई )
वसई : - वसई, चंद्रपाडा:"अनुलोम" संस्थेच्या वतीने “आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी” या विशेष उपक्रमांतर्गत शांती गोविंद शाळा (हिंदी माध्यम), चंद्रपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. प्रतिक चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख करून देत, PPT च्या माध्यमातून मुद्देसूद सादरीकरण व प्रेरणादायी व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना संविधान प्रश्नावली देखील भरून घेण्यात आली.या कार्यक्रमास हर्षला गावडे मॅडम, योजना पाटील मॅडम (मुख्याध्यापिका) तसेच इतर शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी अनुलोम संस्था आणि प्रतिक चौधरी सर यांचा विशेष सत्कार करून भविष्यात अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली.कार्यक्रमात एकूण २०१ विद्यार्थी व ५ शिक्षक सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे शाळेत संविधानाबद्दल जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले.
--------------------------------------------
No comments:
Post a Comment
Thanks for your