(मुलाणी )
म्हसवड (ता. माण, जि. सातारा) –मौजे ढाकणी गावात दारूच्या नशेत घरात घुसून महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली असून म्हसवड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता तक्रारदार सौ. भारती सुभाष ओंबासे (वय 35, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) यांच्या राहत्या घरी घडली. त्या वेळी त्या आपल्या सासू, सुनंदा आणि जाऊ पल्लवी यांच्यासह घरी होत्या.याच सुमारास गावातील सुभाष शंकर खाडे (रा. ढाकणी, ता. माण) हा इसम दारूच्या नशेत कोणते ही कारण नसताना घरात घुसला व महिलांना शिवीगाळ करून दमदाटी केली.या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गु.र.नं. 330/2025 अंतर्गत BNS कलम 333, 352, 351(2)(3), 355 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपास पोहवा डी.पी. खाडे (ब.नं. 376) हे करीत असून भेट देणारे अधिकारी सपोनि सोनवणे (मो. 9970717712) आहेत. आरोपी विरुद्ध अटक तजवीज ठेवण्यात आली आहे.
--------------------------------------------
दु:खद निधन...
आपल्यातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व *ति.अरूणकाका गोडबोले* यांचे चिंतामणी नर्सिंग होम येथे दु:खद निधन झाले आहे... आज संध्याकाळी ५.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली..
अंत्ययात्रा बुधवार दि.१५।१०।२५ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांचे राहाते घर “आनंदी निवास” ६९,शनिवार पेठ, सातारा येथुन निघेल.
रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून सातारा भूषण पुरस्कार देणारे, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे, खिंडीतील गणपती देवस्थान ट्रस्टचे आणि समर्थ सेवा मंडळचे ट्रस्टी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, चित्रपट, सृष्टी, लेखन, पर्यटन, कला, क्रीडा, विज्ञान, बँकिंग तसेच सुप्रसिद्ध कर सल्लागार या सर्व क्षेत्रांमध्ये आपला वेगळा ठसा कायमच उमटवला होता. *आदरणीय श्री अरुण काका गोडबोले* यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो…
No comments:
Post a Comment
Thanks for your