(मुलाणी )
माण तालुका (14 ऑक्टोबर 2025) — माण तालुक्यातील जांभुळणी येथील विरकरवस्ती परिसरात आज सकाळी 55 वर्षीय बाळकृष्ण ज्ञानदेव जानकर यांनी राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना आज, म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली असून, म्हसवड पोलिस ठाण्यात अ.म.क्र. 35/2025 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सदर घटनेची माहिती मृताच्या नात्यातील निलेश संजय जानकर (वय 29, माथाडी कामगार, रा. लाडेवाडी, जांभुळणी) यांनी पोलिसांना दिली.प्राथमिक तपासानुसार जानकर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, सदर घटनेचा पुढील तपास पो.हवा. आर.एल. कुंभार (मो. 9922824546) यांच्या कडून सुरू आहे.प्रभारी अधिकारी सपोनि सोनवणे (मो. 9970717712) यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरू आहे. कायद्याचे कलम: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 प्रमाणे घटना ठिकाण: विरकरवस्ती, जांभुळणी, ता. माण, जि. सातारा
--------------------------------------------
दु:खद निधन...
आपल्यातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व *ति.अरूणकाका गोडबोले* यांचे चिंतामणी नर्सिंग होम येथे दु:खद निधन झाले आहे... आज संध्याकाळी ५.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली..
अंत्ययात्रा बुधवार दि.१५।१०।२५ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांचे राहाते घर “आनंदी निवास” ६९,शनिवार पेठ, सातारा येथुन निघेल.
रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून सातारा भूषण पुरस्कार देणारे, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे, खिंडीतील गणपती देवस्थान ट्रस्टचे आणि समर्थ सेवा मंडळचे ट्रस्टी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, चित्रपट, सृष्टी, लेखन, पर्यटन, कला, क्रीडा, विज्ञान, बँकिंग तसेच सुप्रसिद्ध कर सल्लागार या सर्व क्षेत्रांमध्ये आपला वेगळा ठसा कायमच उमटवला होता. *आदरणीय श्री अरुण काका गोडबोले* यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो…